प्रिय रसिकहो,
कसे आहात? आपल्या ऋतुचक्र : गुढीपाडवा २०२४ कार्यक्रमाच्या सीट्स तुम्ही रिझर्व्ह केल्यात का? नसतील तर त्वरा करा.
वेगवेगळे ऋतू आणि सण आदी ची सांगड घालत वेगवेगळे कार्यक्रम आपल्या पुढे सादर होणार आहेत आणि हे कार्यक्रम पाहण्यासाठी आपण सर्वच खूप उत्सुक असाल ह्याची खात्री आहे. अगदी मोजक्या स्टेप्स मध्ये रेजिस्ट्रेशन करता यावं म्हणून खालील लिंक देत आहोत. कृपया लवकरात लवकर आपली सीट रिझर्व करा आणि आपल्या प्रियजनांच्या कलागुणांचा आस्वाद घ्या.
आपल्या कार्यक्रमाची शोभा यंदा नक्कीच द्विगुणित होणार आहे ती दोन विशेष पाहुण्यांमुळे - त्यांचा थोडक्यात परिचय करून देत आहोत. अर्थात, त्यांचा परिचय करून देण्याची फारशी आवश्यकता नक्कीच नाही, पण त्यांचा सहभाग आणि सहवास आपल्याला लाभतोय हे आपणा सर्वांपर्यंत पोचवावंसं वाटतं.
माननीय श्री. यजुर्वेन्द्र महाजन :
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला" ह्या ओळी अक्षरशः आचरणात आणणारं व्यक्तिमत्व यजुर्वेन्द्रजी. आपल्या 'दीपस्तंभ फाउंडेशन' द्वारे अनेक दिव्यांग आणि अनाथ मुलामुलींचे पालक झालेले, 'मास्तर' ह्या साध्या पण अतिशय ताकतीच्या उपाधीने ओळखले जाणारे, ज्यांच्या गेल्या दशकाहून अधिक अविरत चालत असलेल्या कार्याचा गौरव नुकताच महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांचा हस्ते झाला, असे श्री यजुर्वेंद्र महाजन आपल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्यांच्या कार्याची महती इथे अगदी मोजक्या शब्दात वर्णन करणं कठीणच आहे, पण आपल्या कार्यक्रमात त्यांचा हा प्रवास जवळून पाहता येईल आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला होईल.
दीपस्तंभ फाउंडेशन बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी साठी त्यांच्या वेबसाईट ची लिंक देत आहोत.
https://deepstambh.org/index.php
माननीय श्री. योगेंद्र पुराणिक :
"योगी" हे आपल्या तोक्योकरांचं अगदी लाडकं व्यक्तिमत्व ! त्यामुळे त्यांचा औपचारिक परिचय करून देणं अप्रस्तुत वाटतं. आपल्या एदोगावा परिसराचे माजी आमदार अशी त्यांची मुख्य ओळख असली तरी त्यांच्या कार्याचा आवाका फारच मोठा आहे. एका सरकारी जपानी शाळेचे ते विद्यमान प्रिंसिपल आहेतच, तसेच अनेक ठिकाणी "मोटिवेशनल स्पीकर" म्हणून उपस्थिती, त्यांच्या एदोगावा इंडिया कल्चर सेंटर ह्या संस्थे तर्फे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणणे, भारतीय लोकांना अडीअडचणीत मदतीचा हात देणे अश्या अनेक कार्यांमध्ये ते व्यग्र असतात. नुकतंच महाराष्ट्र शासनाबरोबर 'मराठी भाषा प्रसारा' संदर्भात झालेला सामंजस्य करारही योगीजींच्या परिश्रमाचंच फळ म्हणायला हरकत नाही.
आपल्या सर्वानाच ह्या दोघांच्याही कडून अमूल्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळविण्याची ही सुवर्ण संधी असल्यामुळे आम्ही अगदी उत्साहात आहोत, आपणही असालच ना?
Indiyumm offers a delightful experience of Maharashtra cuisine, nestled along the picturesque riverside of Shinkawa, renowned for its stunning spring and autumn scenery. Our restaurant boasts an array of mouthwatering dishes from across Maharashtra, including some rare gems not easily found in Japan. With a charming ambiance, Indiyumm provides the perfect setting for cherished moments with loved ones, attracting patrons who relish quality time with friends and family. Conveniently located between Funabori and Kasai stations, accessible by bus, and offering ample parking, Indiyumm welcomes you to savor the flavors of Maharashtra in a serene and inviting atmosphere.
Indiyumm Restaurant will have a food stall on the 3rd floor throughout the duration of the event. The stall will offer snacks and tea, and no pre-order is required for snacks.
Indiyumm will also offer take-out bento boxes on pre-order basis. All the pre-orders to be booked & paid in advance on or before 15th April 2024.
Copyright © 2019 TOKYO MARATHI MANDAL - All Rights Reserved.
Powered by GoDaddy